Senior And Selection Grade Online Training Correction Link Available

ऑनलाईन वरिष्ठ वेतनश्रेणी व 

निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणी 

मधील दुरुस्ती लिंक उपलब्ध 

ऑनलाईन वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणीमधील दुरुस्तीबाबत...

संदर्भ :- 1. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/२०२४-२५/०२३६७दि.११/०४/२०२५

2. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/२०२४-२५/०२६१० दि.३०/०४/२०२५

उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येत आहे की, संदर्भीय पत्रानुसार दिनांक २१/०४/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून नावनोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक २ अन्वये नावनोंदणी प्रक्रियेसाठी दिनांक ०६/०५/२०२५ रोजी सायं. ६:०० वाजेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे

यानुसार ऑनलाईन प्रशिक्षण नावनोंदणी करत असताना काही पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण प्रकार व प्रशिक्षण गट यांची निवड करत असताना चुका केलेल्या आहेत. 

अशा प्रशिक्षणार्थ्यांना दिनांक ७/०५/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून दिनांक ८/०५/२०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आपण स्वतः निवड केलेल्या प्रशिक्षण गट आणि प्रशिक्षण प्रकारच्या चुका दुरुस्ती करणेसाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

तरी यानुसार केवळ ज्या प्रशिक्षणार्थ्यांना आवश्यक दुरुस्ती करावयाची आहे, केवळ अशाच प्रशिक्षणार्थ्यांनी सदरच्या कालावधीमध्ये आवश्यक दुरुस्ती करावी. 

ज्या प्रशिक्षणार्थ्यांची नावनोंदणी अचूक झालेली आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांनी कोणतीही दुरुस्ती यामध्ये नोंदवू नये. 

तसेच दुरुस्तीची ही अंतिम संधी प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. नमूद कालावधीनंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली जाणार नाही याची नोंद, नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी घ्यावी अशा सुचना आपल्यास्तरावरून सर्व नोंदणी केलेल्या पात्र प्रशिक्षणार्थ्यांना निर्गमित करण्यात याव्यात, असे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

      प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती 

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२५-२०२६

सर्व माहिती

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

What's Up Group Join 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad