जनगणना 2027 Census 2027
स्वगणना करा घरबसल्या ! संपूर्ण माहिती
जनगणनेसाठी घरबसल्या फॉर्म भरुन स्वगणना करा
फार्म कसा भरायचा ही आम्ही सांगतो.
स्वगणना कधी करू शकता?
महाराष्ट्रासाठी: दिनांक 1 मे ते 15 मे 2026
त्यानंतर दिनांक 16 मे ते 14 जून 2026 पर्यंत प्रगणक घरोघरी येतील.
स्वगणना कशी करायची - 9 सोप्या पायऱ्या:*
1. पोर्टल उघडा:
अधिकृत लिंक खाली दिली आहे
2. राज्य निवडा:
Maharashtra निवडा आणि कॅप्चा भरा
3. मोबाईल OTP:
कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल नंबर टाका → OTP ने लॉगिन करा
4. भाषा निवडा:
16 भाषांपैकी एक निवडा. नंतर बदलता येणार नाही
5. पत्ता भरा:
जिल्हा, पिन कोड, गाव/शहर टाका
6. घर मॅपवर मार्क करा:
डिजिटल मॅपवर तुमच्या घराचे अचूक स्थान मार्क करा
7. 33 प्रश्न भरा:
घर, कुटुंब, सुविधांबद्दल 33 प्रश्नांची उत्तरे द्या
8. Final Submit:
सर्व तपासून Submit करा. नंतर बदल करता येणार नाही
9. SE ID जतन करा:
Submit केल्यावर SE ID मिळेल. SMS/ईमेलवर पण येईल. प्रगणक आल्यावर हीच ID द्यायची
महत्त्वाचे:
1. एक मोबाईल = एक घर. एका नंबरवरून एकच घर नोंदवता येते.
2. मुखिया (कुटुंब प्रमुख) नाव बदलता येत नाही - काळजीपूर्वक भरा.
3. OTP कोणालाही देऊ नका
प्रगणकाला पण OTP द्यायचा नाही. तो फक्त SE ID मागेल
4. फसवणुकीपासून सावध रहा:
जनगणनेच्या नावाने येणाऱ्या लिंक/कॉलवर क्लिक करू नका.
फक्त
खालील अधिकृत साइट आहे.
जनगणना 2027 स्वगणना - अधिकृत लिंक
मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा

आपली प्रतिक्रिया व सूचना