वर्ग पहिली वर्णनात्मक मूल्यमापन
प्रगती पत्रक नोंदी
विषय भाषा
पानावर स्वतःचे चित्र काढण्याचा प्रयत्न करतो.
•कविता पाठोपाठ म्हणतो.
• चित्राचे निरीक्षण करून प्रश्न विचारतो.
• गाणे तालासुरात गातो.
•पावसावर आधारित गाणे गातो.
•पावसावर आधारित गाणे अभिनयासह गातो.
•बोलीभाषेतील गीत गातो.
•गमतीदार प्रसंग वर्णन करतो.
•चित्र पाहून झाड कसे बनते सांगतो.
•परिसरातील बिया गोळा करतो
•बिया रुजविण्याची पद्धत सांगतो.
•आंधळी कोशिंबीर हा खेळ कसा खेळतात ते सांगतो.
•खेळामध्ये प्रत्यक्ष सहभागी होतो.
• परिसरात खेळल्या जाणाऱ्या खेळांची माहिती सांगतो.
•बोलीभाषेतील इतर पावसाची गाणी म्हणतो.
• ढग, वारा, विज चमकणे, बेडकाचा अभिनय करून दाखवतो
• पावसाळ्यातील गमतीदार प्रसंग सांगतो
• पावसा संबंधित चित्रे जमा करतो
•पावसात भिजत आहोत खेळत आहोत असे नाट्य करतो
•गाणे गाण्यासाठी हावभावाचा वापर करतो
•बेडकाच्या गर्वाची गोष्ट सांगतो
• पावसाळ्यात पावसात भिजण्याचा अनुभव सांगतो
• गाण्यातील चित्र पाहून निरीक्षण करतो
•चित्रावर आधारित प्रश्न विचारतो
•बीज कसे रुजते व झाड कसे बनते ते सांगतो
•कडव्या नुसार कृती करतो
• बिया रुजविण्याची पद्धत सांगतो
•बीज हे गाणे कृतीसह म्हणतो
•परिसरातील प्रत्यक्ष पेरणी, खुरपने या शेतकऱ्यांच्या क्रिया सांगतो
• बी रूजण्याशी संबंधित लोकगीते ऐकतो.
• चित्रे पाहून चित्रात काय दिसते ते सांगतो
• खेळाविषयी माहिती देतो.
खेळ कसा खेळतात याविषयी सांगतो.
•लगोरी खेळाविषयी माहिती देतो.
• लगोरी खेळ खेळतो.
•परिसरातील इतर मनोरंजक खेळाची माहिती सांगतो.
• डाबाडूबी, शिवाशिवी यासारख्या खेळांची माहिती सांगतो.
• कॅरम खेळाविषयी माहिती सांगतो.
• जोडीमध्ये खेळ खेळण्याचा सराव करतो.
•बुद्धिबळाचे साहित्य व खेळाचे नियम माहीत करून घेतो.
• प्रत्यक्ष बुद्धिबळ कसा खेळतात हे खेळतो.
•जोडीमध्ये बुद्धिबळ खेळ खेळण्याचा सराव करतो.
•प्राण्यांची चित्रे पाहतो व त्यांची नावे सांगतो.
• आवडत्या प्राण्यांचे वर्णन करतो.
•आवडत्या प्राण्यांचे चित्र काढून ते रंगवितो.
• पाळीव प्राणी व जंगली प्राणी यांचा तक्ता तयार करतो.
• पाळीव प्राणी व जंगली प्राणी यांचा चित्र जमा करतो.
• मित्रांबद्दल माहिती सांगतो.
•मित्र प्रेमाच्या गोष्टी सांगतो.
•चित्रावरून आपले मित्र प्राणी, पक्षी, झाडे या विषयी माहिती मिळवितो.
•परिसरातील पक्षांची नावे सांगतो.
• परिसरातील पक्षांची माहिती सांगतो.
•पक्षांची चित्रे काढून ती रंगवतो.
• शेपटीवाले प्राणी आपले मित्र कसे हे समजावून घेतो.
•परिसरातील प्राण्यांचे आपल्याला होणारे उपयोग समजून घेतो.
आपल्या शाळेतील मुले कोणता खेळ खेळतात याविषयी माहिती व गमती सांगतो.
•चित्रातील प्राण्यांच्या नकला करून दाखवतो.
• तुटकरेषाच्या आधारे अक्षरे गिरवतो.
•नात्या विषयी माहिती सांगतो.
•वाचनपाठ वाचून दाखवतो.
• वाचनपाठाचे वाचन व लेखन करतो.
•दिलेल्या तक्त्यातील अर्थपूर्ण शब्द वहीत लिहितो.
• कुत्रा व मांजर यांच्यातील संवाद वर्गात सादर करतो.
• दूधवाल्या बद्दल माहिती सांगतो.
•मांजरीच्या वेगवेगळ्या नकला करतो.
• कथेतील गमती करून दाखवतो.
• दूधवाला, उंदीर, मांजर यांचे चित्र काढतो.
• शिंपी, लोहार, कुंभार यांची कामे सांगतो.
• बाजारात मिळणाऱ्या वस्तूंची यादी करतो.
• बाजारातील विक्रेत्यांच्या नकला करून दाखवतो.
• वर्गात भेळीसाठीचे साहित्य आणतो.
• फळ विक्रेता फळे कुठून आणतो याविषयी माहिती मिळवितो.
•खाऊच्या डब्यात असणाऱ्या वस्तूंची यादी करतो
• दप्तरातील वस्तूंची यादी करतो.
• बाजाराच्या पिशवीतील वस्तूंची यादी करतो.
• चित्रातील वस्तूंची नावे सांगतो व नावे लिहितो.
•प्रत्येक गटातील शब्द घेऊन वाक्य लिहितो.
• विहिरीचे चित्र काढून दाखवतो.
• गोलातील शब्द वाचतो व लिहितो.
• अर्थपूर्ण शब्दांची यादी तयार करतो.
•चित्राच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य तयार करतो.
• कवितेतील ओळी आणि चित्र यांची माहिती देतो
• अर्थपूर्ण शब्द अक्षर समूहापासून तयार करतो.
•लिहिलेल्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतो.
• कवितेत आलेल्या कठीण शब्दांची यादी तयार करतो.
• यमक जुळणाऱ्या शब्दांची यादी तयार करतो
• गावात भरणार्या यात्रेचे वर्णन करतो.
विषय गणित
दिलेल्या अंकांचे फलकावर लेखन करतो.
• संख्या कार्डाद्वारे लहान मोठी संख्या सांगतो.
• गाळलेले अंक अचूकरित्या सांगतो.
• योग्य संख्या लिहून चौकटी पूर्ण करतो
• क्रमवार संख्या मध्ये मधली संख्या लिहितो.
• सुचविलेली संख्या माळेवर अचूक पणे सांगतो.
• सुचविलेल्या संख्येच्या पुढची व मागची संख्या सांगतो.
• आकृतिबंध तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती सांगतो.
• आकृतिबंधाच्या मदतीने नक्षी काम करतो.
• संख्या मालिकेत आकृतिबंध शोधतो.
•आकृतिबंध तयार करून आणतो.
• योग्य रंगाद्वारे आकृतीबंध पूर्ण करतो.
• चित्रा वरून कोणते आत आहे व कोणते बाहेर आहे ते सांगतो.
• रुंद व अरुंद हे शब्द वापरून तुलना करतो.
• पाठ्यपुस्तकातील आकाराचे निरीक्षण करतो.
• आपल्याजवळील वस्तू व चित्रातील वस्तू यांची तुलना करतो.
• परिसरातील घरातील विविध आकारांच्या वस्तूंची यादी करतो.
• चित्रे व आकार यांच्या योग्य जोड्या लावतो.
• त्रिकोणी, चौकोनी, गोलाकार वस्तूंच्या नावांची यादी बनवतो.
• लांब आखूड वस्तू दाखवतो.
• डावा उजवा हे शब्द कोठे कोठे वापरले जातात ते सांगतो.
• डावा-उजवा चा वापर करतो.
• सप्ताहाचे वार या गीताचे तालासुरात गायन करतो.
• सप्ताहाच्या वारांची क्रमाने नावे सांगतो.
• विविध दैनंदिन वस्तू मोजतो.
•लहान-मोठ्या वस्तूंच्या जोड्या लावतो.
•विविध चित्रे पाहून त्यातील लहान-मोठे चित्र ओळखतो.
• लहान वस्तू मोठ्या वस्तूंचे चित्र वेगवेगळ्या रंगात रंगवतो.
• चित्रावरून मागे पुढे संबोध स्पष्ट करून घेतो.
• मागेपुढे असे चित्र पाहून चौकटीत योग्य पर्याय भरतो.
• विविध उदाहरणावरून लहान-मोठा संबोध सराव करतो.
• वर खाली या संबोधाची ओळख करून घेतो.
• वर-खाली संबोधाचे दृढीकरण करून घेतो.
• वर-खाली असणाऱ्या वस्तूंची नावे व माहिती सांगतो.
• चित्रे पाहून नावे सांगतो.
• चित्रावरून आधी व नंतर सांगतो.
• आधी नंतर हे चित्र रंगवतो.
• चित्राचे निरीक्षण करतो.
• चित्र पाहून चित्राचे वर्णन करतो.
• चित्रावरून एक हा संबोध समजून घेतो.
• एक अनेक या संबोधाची ओळख करून घेतो.
• चित्र पाहून एक अनेक सांगतो.
• एक वस्तू व अनेक वस्तू असणाऱ्या परिसरातील उदाहरणांची यादी बनवतो.
• चित्रावरून फरक ओळखतो.
• चित्र ओळखणे या खेळात सहभागी होतो.
• एक व दोन या अंकाच्या आकाराच्या वस्तू शोधतो.
• दिलेल्या अंकांचे आकार काढून ते गिरवतो.
• पाठ्यपुस्तकातील चित्राचे वर्णन करतो.
• अंकांचे लेखन कसे करायचे हे समजून घेतो.
• अंकांची गाणी लयीत म्हणून दाखवतो.
• चित्र मोजतो व योग्य संख्या भोवती बरोबरची खूण करतो.
• चित्र पाहतो व चित्रांची संख्या मोजून सांगतो.
• विविध अंक मालिकेत योग्य अंगाभोवती बरोबरची खूण करतो.
• चित्र मोजून अंक सांगतो.
• सुचविलेल्या अंकांच्या परिसरातील वस्तूंची यादी बनवतो.
• दिलेले तुटक अंक गिरवतो.
• सुचविलेले उत्तर येईल अशी प्रश्नाद्वारे योजना करतो.
• अंक व चित्र यांच्या योग्य जोड्या लावतो.
• सुचविलेल्या अंक,अंक कार्डातून शोधतो.
• सुचविलेल्या अंकाचे गाणे म्हणतो.
• आठवड्यातील दिवसांची क्रमाने नावे सांगतो.
• इंद्रधनुष्यातील रंगाची नावे सांगतो.
• आठवड्याचा तक्ता तयार करून आणतो.
• छत्री व कोळ्याचे चित्र पाहून 8 या अंकाची ओळख करून घेतो.
• गोलाकार वस्तू वरून व चित्रावरून शून्याची ओळख करून घेतो.
• शून्य संबोध म्हणजे काय हे उदाहरणासहीत स्पष्ट करतो.
• शून्याचे गाणे तालासुरात गा.
• बाकी शून्य राहते अशी उदाहरणे सांगतो.
• चित्रे पाहून कमी-जास्त संबोध स्पष्ट करतो करून घेतो.
• चित्रे मोजून योग्य चित्राखाली बरोबरची खूण करतो.
• वस्तूंच्या साह्याने कमी-जास्त चा सराव करून घेतो.
• मिसळणे, मिळवणे, एकत्र करणे म्हणजे बेरीज हे समजून घेतो.
• चढता-उतरता क्रम समजून घेतो.
• चित्र कार्ड मोजून बेरजेची उदाहरणे सोडवतो.
• चित्र कार्ड पाहून वजाबाकीची उदाहरणे सोडवतो.
• दिलेले मणी क्रमाने मोजतो.
• माळेत दशक एकक रंगाचे मणी दाखवतो.
• मण्यांची माळ तयार करून दाखवतो.
• मणी, आईस्क्रीम काड्या यांचा वापर करून दशकाचा समूह बनवितो.
• विविध वस्तू पासून दशक बनवून दशक उडी स्पष्ट करतो.
• विविध प्रकारची नाणी अचूकरित्या ओळखतो.
• नाणी व नोटा यातील फरक समजावून घेतो.
• सुचविलेल्या रकमेसाठी आवश्यक अचुक नाणी व नोटा देतो.
• रक्कम सांगितल्यावर नाणी वापरणार की नोटा वापरणार हे सांगतो.
• विविध प्रकारच्या ठिपक्याद्वारे रेखांकन करतो.
• तुटक, आडवी-उभी, तिरपी अशा विविध प्रकारच्या रेषा काढतो.
• रेषांचे रेखाटन करतो.
• गायन-वादन करतो.
• बडबडगीते ताला सुरात गातो.
• अक्षरगीत,समूहगीत म्हणून दाखवतो.
• विविध प्रकारच्या बडबड गीतांचा संग्रह करतो.
• मानवी शरीराची आकृती पाहून अवयवांची नावे सांगतो.
• शरीराच्या मुक्त हालचाली करून दाखवतो.
• परिसरातील प्राणी पक्षी यांच्या कृतींचे निरीक्षण करतो.
• परिसरातील प्राणी पक्षी यांच्याप्रमाणे हालचाली करतो.
• शरीराच्या विविध हालचालीतून आनंद मिळवितो.
• कागदाचे विविध प्रकार समजावून घेतो.
•कागद फाडण्याची कृती करून दाखवतो.
• योग्यप्रकारे सांगितल्याप्रमाणे कागदाच्या घड्या घालतो.
• विविध प्रकारच्या ठिपक्याची ओळख करून घेतो.
• परिसरातील वस्तूंची चित्रे पाहून नावे सांगतो.
• वस्तूंची चित्रे काढतो.
• राष्ट्रगीताचे तालासुरात गायन करतो.
• समूहगीत, राष्ट्रगीताचे सामूहिकरत्या व वैयक्तिकरित्या गायन करतो.
•शिर व मानेच्या हालचाली करून दाखवितो.
• स्वराचे गायन करून दाखवतो.
• माती शिल्पांची नावे सांगतो.
• माती शिल्पाच्या नमुन्यांचे निरीक्षण करतो.
• माती पासून वळ्या तयार करतो.
• माती पासून मणी तयार करून दाखवतो.
• माती व पाणी मिसळून चिखल तयार करतो.
• मण्यांची माळ तयार करतो.
• सोप्या वस्तूचे रेखाटन करून दाखवतो. • बॉल, बॅट अशा सोप्या वस्तूंचे रेखाटन करतो.
विषय कार्यानुभव
• पाण्यासंबंधित असलेले चित्र शोधून वहीत चिकटवतो.
• विविध प्रकारच्या आपत्तीच्या चित्रांचा संग्रह करतो.
• परिसरातील बांबूच्या झाडांची पाने गोळा करतो.
• कापसाच्या वाती तयार करतो.
• फळांचा चार्ट तयार करून आणतो
फळ बीयांचे नमुने गोळा करतो.
• मत्स्यव्यवसाय याविषयी माहिती गोळा करतो.
• माशाचे चित्र काढून दाखवतो.
• दैनंदिन जीवनातील वस्त्राचे महत्त्व समजावून घेतो व त्याचे महत्त्व सांगतो.
• बाहुली तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची नावे सांगतो.
• कठपुतली तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची नावे सांगतो.
• बांबू पासून बनणाऱ्या वस्तूंची चित्रे काढतो.
• बांबूपासून तयार होणाऱ्या घरगुती वस्तूंची नावे सांगतो.
• परिसरातील विविध झाडांची पाने, फुले गोळा करून आणतो.
• पाना - फुलाचा वापर करून वर्गाचे सुशोभन करतो.
• कोलाज कामाद्वारे चौकोन काढून चौकोनात झाडाची पाने, फुले चिकटवून सजावट करतो.
• लहान लहान श्लोक म्हणून दाखवतो.
• जलसाक्षरते संबंधी घोषवाक्य गोळा करतो.
• पाण्याच्या स्त्रोतांची नावे सांगतो.
• काडीपेटीतील काड्याची पासून विविध वस्तू तयार करतो.
• कोलाज तंत्राचा वापर करून सजावट करतो.
• काडीपेटीतील काड्याद्वारे अंक बनवतो.
• काडीपेटीतील काड्यापासून घर तयार करतो.
• पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची नावे सांगतो.
• पुष्पगुच्छ तयार करून दाखवतो.
• विविध खाद्य पदार्थांची नावे सांगतो.
• खाद्य पदार्थांची निर्मिती कशी झाली केली जाते याविषयी सांगतो.
• अन्नाची नासाडी होऊ नये याकरिता काय करावे याविषयी चर्चा करतो
• नारळाच्या झाडाचे चित्र काढतो.
• नारळापासून मिळणाऱ्या विविध वस्तूंची नावे सांगतो.
• सुईबाभूळ झाडाच्या बिया गोळा करून आणतो.
• परिसरातील झाडांची नावे सांगतो.
• खाद्यपदार्थांचा तक्ता पाहून नावे सांगतो.
• खाद्य पदार्थांची चित्रे जमवून ती वहीत चिकटवतो.
• झाडांची काळजी घेतो
• शाळेतील झाडांना पाणी टाकतो
विषय शारीरिक शिक्षण
विविध प्रकारच्या हालचाली करून दाखवतो.
• उड्या मारणे, वाकणे, वळणे या हालचालीची कृती करतो.
• इशाऱ्यानुसार जागेवर करावयाच्या हालचालीची कृती करतो.
• विविध व्यायाम प्रकारांची नावे सांगतो.
• उत्तेजक व्यायाम प्रकाराचा सराव करतो.
• सांध्यासंबंधित सर्व उत्तेजक व्यायाम करून दाखवितो.
• सावधान विश्रामची कृती करतो.
• कवायत संचलन वेळी आरामसेची कृती करून दाखवितो.
• आरामसे या कृतीचा वैयक्तिक सराव करतो.
• सावधान विश्राम या कृतीचा वैयक्तिक सराव करतो.
• विविध प्रकारच्या खेळांची नावे सांगतो.
• खेळांचा तक्ता पाहून त्यातील खेळांची नावे सांगतो.
• परिसरात खेळत असलेल्या स्थानिक खेळांची नावे सांगतो.
• प्रत्येक खेळात सहभागी होतो.
• क्रीडांगणात मित्रांना मदत करतो.
• खेळांमध्ये प्रामाणिकपणा हा भाव ठेवतो.
• माहित असलेल्या स्पर्धांची नावे सांगतो.
• उपक्रमावर आधारित असलेल्या लघु खेळांची माहिती संग्रहित करतो.
• उपक्रमावर आधारित स्पर्धेत सहभागी होतो.
• शाळेतील स्पर्धांमध्ये सहभागी होतो.
• आरोग्य संबंधित चांगल्या सवयी सांगतो.
• आहारामध्ये कोणकोणते पदार्थ असतात त्यांची नावे सांगतो.
• क्रीडांगण संबंधित चांगल्या सवयी सांगतो.
• खेळानूरूप पोशाखाची निवड कशी करायची याविषयी माहिती देतो.
• खेळानूरूप पोशाख कसा असतो याविषयी सांगतो.
• जागेवर करावयाच्या हालचालींचा सराव करतो.
• शरीराचा तोल जागच्याजागी कसा सांभाळायचा याची कृती करून दाखवितो.
• उड्या मारत पुढे जाण्याची कृती करतो.
• व्यायाम प्रकारांची नावे सांगतो.
• ए च्या आकारात धावून दाखवतो.
• बी आणि सी च्या आकारात धावतो.
• बेडूक उडी मारून दाखवितो.
• हत्तीच्या चालीचे अनुकरण करतो.
• विविध प्राण्यांच्या हालचाली करण्याच्या स्पर्धेत सहभागी होतो.
• विविध प्राण्यांच्या हालचालीचे अनुकरण करतो.
• पारंपारिक खेळांची नावे सांगतो.
• पारंपारिक खेळाची चित्रासह माहिती संग्रहित करतो.
• क्रीडांगणावर पारंपारिक खेळ खेळतो.
• उपक्रमावर आधारित असलेल्या स्पर्धांची नावे सांगतो.
• उपक्रमावर आधारित विविध प्रकारच्या लघु खेळात सहभागी होतो.
विविध प्रकारच्या व्यायाम प्रकाराचा तक्ता चित्राद्वारे तयार करतो.
• स्वच्छतागृहाच्या वापरा विषयी माहिती सांगतो.
• वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व जाणतो.
• वर्गातील क्रीडांगणा संबंधित चार्टचे निरीक्षण करतो.
• शाळेचे मैदान स्वच्छ ठेवतो.
• मैदान स्वच्छ करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची नावे सांगतो.
• कवायत योग्यरीत्या करतो.
• धावण्याचे प्रात्यक्षिक मैदानावर करून दाखवतो.
• जागेवर लंगडी घालत पुढे जाण्याची कृती करतो.
• इशाऱ्यानुसार विविध प्रकारच्या हालचाली करून दाखवितो.
• गॅलपिंग ची हालचाल करून दाखवितो.
• तालबद्ध व्यायाम प्रकाराची नावे सांगतो.
• ससाहित्य व्यायाम प्रकार तालबद्ध रितीने करतो.
• डंबेल्स व्यायाम प्रकार कृतीसह करून दाखवितो.
• तालबद्ध व्यायाम प्रकारांचा सराव करतो.
• सूर्यनमस्कार या व्यायाम प्रकाराची ओळख करून घेतो.
• सूर्यनमस्काराची कृती करून दाखवितो.
• लटकणे ही कृती करून दाखवितो.
• परिसरातील खेळांची नावे सांगतो.
• लघु खेळांची नावे सांगतो.
• आरोग्याशी संबंधित चांगल्या सवयींची माहिती सांगतो.
• विश्रांतीचे महत्त्व जाणतो.
• आरोग्य चांगले राहण्यासाठी झोपेची आवश्यकता का आहे याचे कारण सांगतो.
• विश्रांती व झोप शरीराला आवश्यक आहे त्याविषयी माहिती सांगतो.
What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना