PFMS Portal HDFC Bank New Update

PFMS प्रणाली HDFC बँकेत

सुरु होणार आहे ! MPSP मुंबई

प्रा शि प मुंबई यांचेकडून सर्वाना सूचना आहे कि BRC स्तर, SMC स्तरावर PPA काढणे तातडीने आजपासूनच बंद करावे

  - बँक ऑफ महाराष्ट्र चे खाते बंद करण्यात येत असून HDFC बँकेत सुरु होणार आहे.

समग्र शिक्षा अभियान अनुदान

ज्या शाळांचे अनुदान खर्च झाले नाही त्या शाळांचे अनुदान नवीन बँक खाते मध्ये वर्ग करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचे अनुदान माघारी जाणार नाही.

तरी सर्व शाळांना सूचित करण्यात येते की पुढील सूचना येईपर्यंत आज पासून कोणीही PPA काढू नये.

लेखाधिकारी समग्र शिक्षा

समग्र शिक्षा अभियानांतर्गत मिळणाऱ्या विविध अनुदान करिता महाराष्ट्रातील सर्व शाळांची खाते बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये SNA | Account Zero Balance मध्ये ओपन केलेले होते. 

सदर खात्यामध्ये समग्र शिक्षा अभियानचा निधी मागील एक वर्षापासून शाळांना PFMS प्रणालीच्या माध्यमातून मिळत होता.

 मात्र राज्यातील ७० हजार शाळांची कामे करण्यास ही बँक अपुरी पडत आहे. यामुळे मुख्याध्यापकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत होता.

पर्यायाने केंद्र शासनाने दिलेले अनुदानित बऱ्याच शाळेचे अल्प प्रमाणात खर्च झाले.

 काही शाळेंचे PPA व्यवस्थित जनरेट न होऊ शकल्यामुळे परत प्राप्त लिमीट परत गेली आहे

अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यामुळे राज्य कार्यालयाने केंद्र शासनाकडून SNA बँक खाते शिफ्ट करण्याची परवानगी मागीतली होती

ही परवानगी राज्यशासनास केंद्रशासनाकडून प्राप्त झाली असून शाळांची सर्व खाते लवकरच शिफ्ट होत आहेत.

यासंदर्भामध्ये शाळांना दिलेली लिमिट तात्काळ तालुक्यावर BRC ला परत घेतली जाणार असून बँक शिफ्ट झाल्यानंतर ही लिमिट परत शाळेला दिली जाणार आहे.

 ही लिमिट परत करण्यासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी काहीही करण्याची गरज नाही.

 केवळ मुख्याध्यापकांनी आपल्याकडे असलेली लिमिट विहीत फॉरमॅटमध्ये शाळा स्तरावरील Chaker Maker च्या माहितीसह तात्काळ BRC स्तरावर द्यायची आहे.

ही सर्व कार्यवाही BRC स्तरावर केली जाणारा असू याचा मुख्याध्यापकांना कोणताही त्रास होणार नाही. याची प्रशासन काळजी घेणार आहे. 

ज्या शाळेचे गणवेश, बांधकाम किंवा इतर अनुदान लिमिट आहे. ती देखील त्यांनी खाते ट्रान्सफर होताच केली जाईल.

आपल्या शाळेचे HDFC बँकेमध्ये व्हर्च्यवल पध्दतीने नवीन खाते उघडले जाणार आहे. हे खाते खोलतात तात्काळ शाळांना ही लिमिट परत दिली जाणार आहे

जिल्हास्तर / तालुकास्तर/ शाळास्तर/KGBV, DIET, SCERT Pune यांना PFMS प्रणालीवर देण्यात आलेल्या लिमिट संदर्भात.

समग्र शिक्षा करिता मप्राशिप कार्यालयाचे SNA खाते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कार्यान्वित आहे. 

संदर्भ क्र.१ च्या अनुषंगाने जिल्हा मनपा यांना समग्र शिक्षा योजने करिता HDFC Bank खाते सुरु करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. 

त्यानुसार HDFC Bank मध्ये जिल्हा व तालुकास्तरापर्यंत खाती उघडण्यात आली आहेत.

सद्यस्थितीत बँक ऑफ महाराष्ट्र ऐवजी HDFC Bank चे PFMS प्रणालीत Mapping व तांत्रिक  प्रक्रिया करणे क्रमप्राप्त आहे.

 राज्यस्तरावर HDFC Bank ही SNA म्हणून नियुक्त केल्यानंतर जिल्हा व तालुकास्तरावरही Implimenting agency ना HDFC Bank मार्फत निधी वितरीत करण्यात येईल.

बँक ऑफ महाराष्ट्र मधून प्रत्येक Implimenting Agency स्तरावर Hierarchy नुसार (District/BRC/CRC/SMC/SCERT/DIET / KGBV) यांनी आपापल्या स्तरावरून देण्यात आलेली Withdraw Limit त्या त्या स्तरावरून Withdraw करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय २ च्या VC मध्ये देण्यात आलेल्या सूचनानुसार तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. विहित कालावधीत उपरोक्त सूचनांचे पालन न केल्यास उद्धभवणाऱ्या तांत्रिक समस्यांची जबाबदारी त्या त्या स्तरावरील कार्यालयाची राहील याची नोंद घ्यावी

असे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

PFMS प्रणाली मार्फत समग्र शिक्षा अभियान संपूर्ण प्रक्रिया मार्गदर्शन

Maker Login

Chekar Login

Vendor तयार करणे

गणवेश खरेदी

शाळा अनुदान खर्च

खालील लिंक वर क्लिक करा

       PFMS प्रणाली

PFMS प्रणाली मार्फत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्व आर्थिक व्यवहार करणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad