MDM Portal Back Date Entry Tab Available

शालेय पोषण आहार बँक डेटेड

माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना दैनंदिन उपस्थिती भरण्याची सुविधा MDM Portal वर  उपलब्ध करून देण्यात येत आहे

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना बँक डेटेड माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे बाबत

उपरोक्त विषयान्वये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमार्फत दैनंदिन आहार घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या उपस्थितीची माहिती एमडीएम पोर्टलवर, मोबाईल MDM App व वेबपोर्टलच्या माध्यमातून अद्यावत करण्यात येते.

 शाळांनी ऑनलाईन भरलेल्या माहितीच्या आधारे इंधन भाजीपाला तसेच धान्यादी मालाची देयके जनरेट करण्यात येऊन शाळांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येत आहे. 

कोविड- १९ साथीच्या प्रादूर्भावामुळे मागील दोन वर्षापासून शाळांचे ऑनलाईन उपस्थितीची माहिती भरण्याचे काम बंद असणे तसेच दरम्यानच्या कालावधीमध्ये कोरड्या स्वरुपातील धान्यादी मालाचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आल्यामुळे ऑनलाईन उपस्थिती नोंदविण्यात आलेली नाही. 

माहे मार्च २०२२ पासून शाळास्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 

तथापि अनेक शाळांचे App अद्यावत नसणे शिक्षकांची नोंदणी नसणे किंवा इतर काही तांत्रिक कारणामुळे दैनंदिन उपस्थितीची माहिती भरण्याचे प्रलंबित असल्याची निवेदने संचालनायास प्राप्त झाली आहेत.

केंद्र प्रमुख तथा तालुका लॉगिन

उक्त बाबत सर्व जिल्ह्यांना सूचित करण्यात येते की, शाळांना मागिल कालावधीची (माहे मार्च, २०२२ ते सप्टेंबर, २०२२ अखेर ) दैनदिन प्रलंबित उपस्थिती भरण्याकरीता केंद्र प्रमुख तथा तालुका लॉगिनवर 

दिनांक ०१.१०.२०२२ ते ११.१०,२०२२ या दरम्यान सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

MDM Portal Maharashtra

Step √

CRC Login खालील लिंक वर क्लिक करा

     MDM Portal Login

1) CRC Login केल्यानंतर आपल्याला ज्या दिनांकाची शालेय पोषण आहार उपस्थित भरायची आहे तो दिनांक निवडा

2) Cluster Tab वर क्लिक करा त्यानंतर आपल्याला आपल्या केंद्राचे नाव दिसेल त्या नावावर क्लिक करा

3) आता आपल्याला आपल्या केंद्रातील सर्व शाळा दिसेल त्या यादीतील आपल्या शाळेच्या नावासमोर Add हे ऑप्शन वर क्लिक करा

4) त्या दिनांकाची शालेय पोषण आहार Pulses Used मेनू निवडा

5) आता आपल्याला नवीन डिस्प्ले दिसेल
त्या दिनांक ची पटसंख्या उपस्थिती भरावी

6) आता माहितीपूर्ण भरल्यानंतर Update ऑप्शनवर क्लिक करा आपली माहिती Save झाली आहे असा मेसेज दिसेल

7) आता आपली स्क्रीन आपोआप मागे जाईल
वरील प्रमाणे असे सर्व मागील पेंडिंग शालेय पोषण आहार ची माहिती भरावी

 

MDM App Download

स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाजाबाबत

सदरच्या कालावधित आपल्या जिल्ह्यातील काही शाळांची दैनंदिन उपस्थिती भरण्याची प्रलंबित असल्यास, अद्यावत करून घेण्यात यावी. तद्नंतर तसेच संचालनालयस्तरावरुन देयके जनरेट करण्यात आल्यानंतर अशा प्रकारची कोणतीही सुविधा शाळांना उपलब्ध करुन देण्यात येणार नसलेबाबत शाळांना अवगत करुन देण्यात यावे, तसेच शालेय पोषण आहार योजनेस पात्र सर्व शाळा एमडीएम पोर्टलवर उपस्थितीची माहिती अद्यावत करीत असलेबाबत नियमितपणे आढावा घेण्यात यावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad