Ads Area

STARS Project Baseline Test Marathi Subject Instructions For Teachers

STARS' प्रकल्पांतर्गत

पायाभूत चाचणी २०२३-२४ 

मराठी शिक्षकांसाठी सूचना


Baseline Test Marathi Subject

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार विदयार्थ्यांची अध्ययन ही अध्ययन निष्पत्तींच्या आधारे तपासली आहे. या पुढील काळात होणारी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणे अध्ययन असणार आहेत, त्यामुळे पायाभूत चाचणी करताना मागील इयत्तांच्या विषयनिहाय अध्ययन विचारात घेतल्या आहेत.


तोंडी चाचणी घेण्यासाठी सूचना :


१) तोंडी चाचणीसाठी काही पूरक साहित्य आवश्यकता असल्यास (उदा. शब्द कार्डे, वाक्य कार्डे, चित्रे इ.) असे साहित्य पुरेशा संख्येने चाचणी सुरू करण्यापूर्वी तयार करून ठेवावे.

२) तोंडी चाचणी घेत असताना चित्र निरीक्षण, श्रवण, वाचन इ. कृतींसाठी विदयार्थ्यांना पुरेसा वेळ दयावा. ३) विदयार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त वातावरणात चाचणी घेण्यात यावी.

४) वयोगटानुसार विदयार्थ्यांच्या घरच्या/परिसर भाषेचा स्वीकार करावा.

५) तोंडी प्रश्नांचा विदयार्थ्यांचा प्रतिसाद वैयक्तिक स्वरूपात घ्यावा व प्रतिसादानुसार लगेचच प्रत्येक विदयार्थ्याच्या प्राप्त गुणांची नोंद दिलेल्या गुणनोंद तक्त्यात करावी, अर्धा गुण देऊ नये.

लेखी चाचणी घेण्यासाठी सूचना :

 १) इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलांसाठी एक एक प्रश्न वाचून दाखवावा, काय करावयाचे आहे, हे समजावून सांगावे व तो प्रश्न सोडवायला सांगावा. याप्रमाणे एक एक प्रश्न पूर्ण करत चाचणी सोडवून घ्यावी.

२) इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विदयार्थ्यांना आवश्यकता आहे त्यांना प्रश्न समजावून सांगावा. मात्र उत्तराचा संकेत देऊ नये.

३) विद्यार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त वातावरणात चाचणी घेण्यात यावी. शाळेच्या मधल्या सुट्टीची वेळ झाल्यास अथवा मुले कंटाळली आहेत असे वाटल्यास थोडा वेळ थांबून नंतर उरलेली चाचणी घेण्यास हरकत नाही.

४) लेखी चाचणीमध्ये उत्तरे लेखनासाठी आवश्यक जागा देण्यात आलेली आहे.

५) संबंधित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या वर्गात ही चाचणी घ्यावयाची आहे व ती तपासावयाची आहे.

६) प्रत्येक विदयार्थ्याची सदय:स्थितीमध्ये नेमकी संपादणूक कशी आहे, हे पाहणे हा मुख्य उद्देश चाचणी घेण्यामागे आहे. दिव्यांग विदयार्थ्यांच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विदयार्थ्यांचा दिव्यांग प्रकार लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.

७) प्रात्यक्षिक/तोंडी आणि लेखी चाचणीचा गुणनोंदणी तक्ता चाचणीच्या सुरुवातीला देण्यात आलेला आहे. प्रश्ननिहाय गुणांची नोंद सदर तक्त्यात शिक्षकांनी करावयाची आहे. अर्धा गुण देऊ नये.

८) शिक्षकांनी विदयार्थ्यांच्या गुणांचे विश्लेषण करून वर्गस्तरावर गरजेनुरूप कृती-कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे

मराठी शिक्षकांसाठी सूचना

गणित शिक्षकांसाठी सूचना

What's Up Group Join

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. गुण नोंदणी तक्ता पाठवावा

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad